अकोला शहरातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणात अटक केलेले आठही आरोपी पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, अकोला पोलिसांनी आरोपींना सोबत घेत घटनास्थळ गाठून सीन रिक्रिएशन केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या आरोपींनी मृतदेह जाळल्यानंतर राख पोत्यात भरून कुठे नेली, कुठे फेकली याचाही शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तर यातील मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर यांचाही इतिहास पोलीस तपासत आहेत.