माथेरानच्या विकासासाठी पुढील 5 वर्षांचा स्वतंत्र रोडमॅप तयार करून पर्यटन खात्याकडून जास्तीत जास्त निधी देण्याची घोषणा पर्यटन मंत्री नामदार शंभूराजजी देसाई यांनी श्रीराम चौकातील सभेत केली. रस्ते, पर्यावरणपूरक पर्यटन, निवासव्यवस्था, इ-रिक्षा व घोडेवाले यांचा समन्वय, पायाभूत सुविधा तसेच जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने माथेरानचे उन्नतीकरण यावर त्यांनी भर दिला. खासदार श्रीरंग बारणे यांनी मिनी ट्रेन, रस्ता विकासासाठी आणलेल्या 150 कोटी निधीची आठवण करून देत चंद्रकांत चौधरी यांना नगराध्यक्ष बनवण्याचे आवाहन केले. आमदार महेंद्र थोरवे यांनी 88 कोटींच्या निधीपासून ‘पर्यटक देवो भवः’, फिनिक्युलर व रोप-वे प्रकल्प, अनधिकृत घरांना न्याय देण्याचे प्रयत्न यांचा उल्लेख केला. विरोधकांवर टीका करत “माथेरान हिंदुत्वाचा वारसा असलेले शहर आहे” असे त्यांनी स्पष्ट केले.