जळगाव: शिरसोलीतील स्मशानभूमीच्या जागेवरून वाद; बौद्ध समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची जागा ग्रामपंचायत, सरपंच आणि सदस्यांकडून बेकायदेशीररित्या स्थलांतरित करून तेथे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करत बौद्ध समाजाने सोमवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.