औसा: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औसा येथे स्वामी रामानंद तीर्थ यांना आ. आमदार अभिमन्यू पवार यांचे अभिवादन
Ausa, Latur | Sep 17, 2025 औसा - 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून संपूर्ण मराठवाड्यात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो 17 सप्टेंबर 1948 साली जुलमी निजामाच्या तावडीतून मराठवाड्यातील आठ जिल्हे मुक्त करण्यासाठी मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. यामध्ये मराठवाड्यातील आद्य स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे स्मारक औसा येथील खादी कार्यालयासमोर उभारण्यात आल्या असून आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.