मोहाडी: बेटाळा येथे हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर मोहाडी पोलिसांची धाड,4 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त
मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा बेटाळा येथे दि. 22 सप्टेंबर रोज सोमवारला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मोहाडी पोलिसांनी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड घालून आरोपी प्रमिला गोपीचंद शेंडे या महिलेच्या ताब्यातून प्लास्टिक डबकीत ठेवलेली 21 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 4 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी महिला आरोपी विरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.