परभणी: पोखर्णी फाटा येथील भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल, अज्ञात वाहनाचा शोध सुरू
परभणी गंगाखेड रस्त्यावरील पोखर्णी फाटा येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला परंतु अद्याप त्या वाहनाचा शोध लागला नसून दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास या घटनेतील सीसीटीव्ही व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.