मारेगाव: पानटपरीसमोर ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने केली लंपास, आंबेडकर चौक येथील घटना
मारेगाव तालुक्यातील एका शेतमजुराची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी रात्री घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहे.