औसा -राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी औसा नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली असून 6 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून या निवडणुकीसाठी प्रशासन सर्वतोपरी सज्ज असल्याची माहिती तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी दिली.शहरातील सुमारे 32 हजार मतदारांसाठी मतदान केंद्रांची सर्व यंत्रणा तयार करण्यात आली आहे.