बार्शीटाकळी: "शेतकऱ्याची काळी दिवाळी; सरकारला जागं करा!" सकल मराठा कुणबी समाजाचं हरीश पिंपळे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन
बार्शिटाकळी येथील सकल मराठा कुणबी समाजाच्यावतीने मूर्तिजापूर येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या कार्यालयासमोर सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं.शेतकऱ्यांची “काळी दिवाळी” साजरी करत आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती बांधून सरकारला जागं करण्याचा इशारा दिला. या आंदोलनाचं नेतृत्व राजू पाटील शिंदे यांनी केलं. संघटनेने सहा प्रमुख मागण्या मांडल्या संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरी यास इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या.