पवनी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर-ठाकरे यांनी 10 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान प्रभाग क्रमांक चार, ताडेश्वर वार्ड येथे विशेष दौरा करून विविध कामांची तसेच स्थानिक समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रभागातील सुरू असलेल्या कामांचा दर्जा तपासला आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या जाणून घेत त्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.