माथेरान मध्ये नगरपालिका निवडणूक मध्ये नगराध्यक्ष पदाकरिता दुरंगी लढत होत असून माथेरान मध्ये अनुभवी नेतृत्व अजय सावंत यांनी आपली शेवटची निवडणूक असे जाहीर करत नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिवसेंदिवस त्यांना नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर ते या निवडणुकीत सामोरे जात आहे. माथेरानच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही सावंत हे मतदारांना देत आहेत.