भोकरदन: शहरातील सुतार गल्ली परिसरामध्ये रहिवाशांच्या नळाला येत आहे गटाराचे पाणी, नगरपरिषदेचे दुर्लक्ष
आज दिनांक 6 जून 2026वार शनिवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील सुतार गल्ली परिसरामध्ये असलेल्या रहिवाशांच्या नळाला गटाराचे पाणी येत असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याच्या नळाला आलेले हे गटाराचे पाणी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूट केले आहे याकडे भोकरदन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गजानन तायडे, नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी वेळीच लक्ष देऊन नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.