भूसंपादन घोटाळा प्रकरणी 10 जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची माहिती
Beed, Beed | Nov 20, 2025 राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटीचा घोटाळा. भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी यांच्या तक्रारीवरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भूसंपादनातील अधिकारी, कर्मचारी, वकील यांनी संगनमताने हा कोट्यावधीचा घोटाळा केल्याचे प्रथमदर्शी उघडकीस आले असून बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती पाहता तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक