घोडेगाव येथे किरकोळ कारणावरून दाम्पत्यास मारहाण झाल्याची घटना घडली.चांदा-घोडेगाव रोडवर फिर्यादी शिवाजी दादा शेगर यांचा मुलगा दीपक शिवाजी शेगर यास अक्षय प्रकाश सावंत याने दुचाकीचा कट मारल्याच्या कारणावरून वाद झाले. तेव्हा माझ्या मुलाला का मारले? याची विचारणा करण्यासाठी आरोपी यांच्या घरी गेलो असता त्यांनी मला व माझ्या पत्नीला शिवीगाळ लाथाबुक्यांनी मारहाण केली.