जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भरधाव १८ चाकी ट्रकने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे.३१ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास, शाहीन अंजुम आणि त्यांची मैत्रीण रेश्मा मकसूद शेख या दोघी बजाज चेतक मोपेडने जरीपटका येथून घरी परतत होत्या. खोब्रागडे चौकाकडून सोमानी टाईल्स दुकानासमोरून जात असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव १८ चाकी ट्रकने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली.