पालघर: सुप्रसिद्ध जीवदानी माता मंदिर येथे शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
विरार येथील सुप्रसिद्ध जीवदानी माता मंदिर येथे शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. जीवदानी मातेचे विधिवात पूजाअर्चा करून घटस्थापना करण्यात आली. लाखो भावीक नवरात्रोत्सव व दरम्यान देवीच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही द्वारे देखील मंदिर परिसरात नजर ठेवण्यात येत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांनी मातेचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.