प्रकाश शहा हे इन्स्टा कार्ड कंपनीच्या ऑफिसमध्ये इन्फोर्समेंट ऑफिसर म्हणून काम करतात. पोलीस ठाणे प्रताप नगर हद्दीतील गोपाल नगर येथे या कंपनीचे ऑफिस आहे. या कंपनीचे त्यांनी ऑडिट केले असता कंपनीतील काम करणारे कर्मचारी कुणाल पांडे श्रेयश मेश्राम साहिल मेश्राम व त्यांचे इतर आठ साथीदार यांनी संगणमत करून ग्राहकांना पाठविण्यात येणारे पार्सल ज्यामध्ये महागडे मोबाईल व इतर साहित्य ते ग्राहकांना न पोहोचविता तब्बल 22 लाख 34 हजार 96 रुपयांची फसवणूक केली.