समुद्रपूर: शिरपूर शिवारात वाघाच्या बच्छड्याचा दोन बकऱ्या हल्ला: दोन्ही बकऱ्या ठार :मेढपाळाचे २५ हजार रुपयांचे नुकसान
समुद्रपूर तालुक्यातील गिरड खुर्सापार परिसरात गेल्या ११ महिन्यापासून एक वाघीण तिन पिल्ले आणि एक वाघ यांनी चांगलीच दहशत निर्माण केली असून कोणत्याही मनुष्याला इजा पोहोचवली नसली तरी अनेक जनावरांचा फड्याशा पाडला आहे.आता तर वाघांच्या पिल्यानी जनावराची शिकार करायला सुरुवात केली असून शिरपूर शिवारात पहिल्यांदा यातील एक पिल्याने दोन बकऱ्यांना ठार केले.दुपारी सुमारास प्रशांत कवडू जुगनाके यांच्या बकऱ्या शिरपूर शिवारात चरत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवला.