समुद्रपूर: वर्धा जिल्हा परिषद एम्प्लईज को ऑप बॅंके सह इतर दोन दुकानाचे शेटर तोडून चोरीचा प्रयत्न:५ लाख ६२ हजार रुपये वाचले
समुद्रपूर: डायमंड कॅमलेक्स मशील वर्धा जिल्हा परिषद एम्प्लईज को ऑप बॅंके सह इतर दोन दुकानाचे शेटर तोडून चोरट्यांनी चोरी चा प्रयत्न केला असल्याची घटना दिनांक ९ डिसेंबरच्या सकाळी उघडकीस येताच सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल होऊन तपास सुरू केला. बँकेतील तिजोरी फोडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने तिजोरीत असलेले ५ लाख ६२ हजार रु होते मात्र ते वाचले तर बाजूला वामन फटींग याचे पवन हार्डवेअर हे दुकान होते त्याचे काउंटर मध्ये १५ हजार रुपये चोरून नेले.