भोकरदन: राजुर येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांची व वाहनधारकांची गर्दी
आज दिनांक 13 मे 2020 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील राजुर येथे पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांची व वाहनधारकांची पेट्रोल डिझेल घेण्यासाठी एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले आहे, मागील काही दिवसापासून राजूर गावासह परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल तुटवडा जाणवत आहे आणि ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळत आहे त्या पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे कारण खरीप हंगाम पूर्व शेतकऱ्यांचे कामे समोर आली आहे,त्यामुळे ट्रॅक्टर साठी पेट्रोल डिझेल लागत आहे.