बिलोली: बिलोली येथे एमआयडिसी जागेच्या मोजणीला सुरुवात, बिलोली तालुक्यातील बेरोजगारांना मिळणार रोजगार
Biloli, Nanded | Oct 29, 2025 आज दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून बिलोली शहरालगत नव्याने एमआयडीसीसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची मोजणी सुरू करण्यात आले असून दुपारी एमआयडीसी चे अभियंता ढवळे सर्वेयर फळ मॅडम तहसीलदार शिंदे, पोनि भोसले आदींनी जागे संदर्भात पाहणी केली असून जमीन मोजणीस सुरुवात झाली असून येत्या काही महिन्यात म्हणा की दिवसात म्हणा बिलोलीत एमआयडीसी होणार असून विविध कंपन्या या ठिकाणी आपली गुंतवणूक करणार आहेत यामुळे बिलोली शहर व ग्रामीण भागातील बेरोजगारांना आता रोजगार ची संधी यामुळे उपलब्ध होणार आहे.