जालना: वडिलांचे छत्र हरवूनही जिद्दीने गाठले यश; उज्जैनपुरीची भाग्यश्री पिंपळे पोलीस कॉन्स्टेबल
Jalna, Jalna | Apr 17, 2026 जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर जीवनातील संकटांवर मात करत बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी येथील भाग्यश्री कचरू पिंपळे हिने पोलीस कॉन्स्टेबल पदावर यश मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलीने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत मिळवलेले हे यश आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. उज्जैनपुरी गावातील ही पहिलीच मुलगी पोलीस दलात दाखल झाली असून, तिच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाग्यश्रीच्या या यशाचा जल्लोष गावकऱ्यांनी मिरवणूक का