सातारा: लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी, विजेचा लपंडाव, बाजारपेठेत चार चाकी वाहनांना प्रवेश बंद
Satara, Satara | Oct 20, 2025 सातारा शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोती चौक येथे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे सातारा शहरासह ग्रामीण भागातील नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी आले असून सायंकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे त्यामुळे दिवाळीच्या सणाला बाजारात अंधार पसरले आहे तर मोती चौकात वाहतूक ही वारंवार ठप्प होत आहे, दिवाळीत येणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारपेठेत चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे,