भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो पिकअपने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टवर बसलेला संजय नामदेव कोळी (वय ३७, रा. गेंदालाल मिल) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली. धडक देणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनचालक मनिष उर्फ खाज्या अशोक बेड (रा. शिवाजीनगर) याच्याविरुद्ध दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.