उरण तालुक्यातील प्रसिद्ध मोरा बंदर ते मुंबई भाऊचा धक्का दरम्यानच्या 75 कोटी खर्चाचे मोरा रोरो सेवेचे अनेक वर्षे रखडलेले काम आता एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा नवा मुहूर्त आहे. त्यामुळे हे काम पूर्णत्वास जाणार आहे. मोरा मुंबई रोरो सेवेचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडले होते. आतापर्यंत या सेवेचे काम 50 टक्के पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून देण्यात आली आहे.