पालघर: दिवाळी पाडव्यानिमित्त विरार येथे महावादन 2025 कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन
दिवाळी पाडव्यानिमित्त विरार येथे महावादन 2025 कार्यक्रमाचे यंग स्टार ट्रस्टच्या वतीने आयोजन करण्यात आले. दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात ढोल ताशा पथक, लेझीम नृत्य, शस्त्र संचालक आदींसह विविध सांस्कृतिक पारंपारिक कलांचे प्रदर्शन करत मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक पारंपारिक वेशभूषा परिधान या दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले.