चंद्रपूर: कोंडी वार्ड क्र. ५ येथे सुशोभनीय स्वागत प्रवेशद्वार उभारा : शिंदे शिवसेनेची उर्जानगर सरपंचाला मागणी
महाराष्ट्रातील ग्राम पंचायती मधील सर्वाधिक उत्पन्न असलेली ग्रा. पं. उर्जानगर येथील महात्मा ज्योतिबा फुले मार्ग कोंडी वार्ड क्र. ५ येथे साध्या पद्धतीचे स्वागत प्रवेशद्वार उभारण्याचे काम उर्जानगर ग्राम पंचायत करीत असल्यामुळे सदर प्रवेशद्वार काम तात्काळ बंद करुन भव्य व सुशोभनिय स्वागत प्रवेशद्वार उभारण्याची मागणी शिवसेना भारतीय कामगार संघटना जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी सरपंच, ग्रा. वि. अधिकारी व सदस्यांना आज दि 15 सप्टेंबर ला 4 वाजता निवेदनाद्वारे केली आहे.