मानगाव: मुंबई – गोवा महामार्गावर कळमजे पुलाजवळ भीषण अपघात; १ ठार,१० जखमी
Mangaon, Raigad | Nov 26, 2025 मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावपासून १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कळमजे पुलाजवळ मुंबई – मालवण शिवशाही बस व अशोक लेलंडमध्ये समोरासमोर जोरदार धडक लागून भीषण अपघातात झाला. या अपघातात एकाच मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. सदरील अपघात बुधवार दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ : १५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले असून शिवशाही बसचा दर्शनी भागापासून मागील काही भाग कापून गेला आहे. याबाबत नोंद झाल्याची माहिती दुपारी 2 वाजता देण्यात आली.