तिरोडा: झाडावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; लाखेगाव येथील घटना
Tirora, Gondia | Sep 18, 2025 तिरोडा तालुक्यातील लाखेगाव गावात बुधवारी दिनांक १७ सप्टेंबरला घडलेल्या एका दुःखद घटनेत ३५ वर्षीय कैलाश सूरजलाल पटले यांचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, मृत कैलाश पटले हे १७ सप्टेंबरच्या सकाळी घरातून शेळ्या चरण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी ते शेतातील एका झाडावर चढले आणि घरासाठी लाकडे तोडत होते. लाकडे तोडत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट खाली पडले.