प्रकाशमय पर्व दिवाळीचे औचित्य साधत भंडारा येथील खांबतलाव परिसरात २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजता दरम्यान ५१ हजार दिवे लावून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रभू श्री राम उत्सव व खांबतलाव पुनर्विकास समितीद्वारे आयोजित या सोहळ्यात श्रीरामांच्या चरणी दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली. या दीपोत्सवादरम्यान फटाक्यांची शानदार आतिषबाजी करण्यात आली, तसेच भक्ती गीत गायनही सादर झाले, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय आणि उत्साहाने दुमदुमून गेला. दिव्यांच्या आकर्षक आरासने संपूर्ण खाम तलाव परि