दीड वर्षांसाठी हद्दपार असलेला पोलीस रेकॉर्डवरील अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद (वय २४, रा. सुप्रिम कॉलनी) हा विना परवानगी शहरात फिरतांना मिळून आला. रविवारी ११ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध १२ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.