जालना: वडगाव येथील शेतकऱ्यांनी केली जालना तहसीलदार यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त
Jalna, Jalna | Jun 23, 2026 आज दिनांक 23 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील वडगाव येथील शेतकरी भास्कर तिरुखे व इतर काही शेतकऱ्यानि जालनाच्या तहसीलदार छाया पवार यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे या शेतकऱ्यांचा काही दिवसांपासून गावातीलच काही शेतकऱ्यांसोबत रस्त्याच्या वादातून वाद सुरू आहे, तसेच यामध्ये उपविभागीय अधिकारी दौंड यांनी शेतकऱ्यांकडून निकाल दिला आहे मात्र या निकालाला केराची टोपली दाखत तहसीलदार छाया पवार यांनी मनमानी करत रस्ता देण्याचे काम सुरू केले आहे.