भंडारा: शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे बनावट सोन्याची फसवणूक; अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल
भंडारा शहरातील पोस्ट ऑफिस चौकात एका व्यक्तीला बनावट सोन्याची साखळी देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनपाल रघुनाथ गडपायले (वय ५५, रा. रमाबाई आंबेडकर वार्ड, भंडारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता ते पोस्ट ऑफिससमोर असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्याशी संपर्क साधला. त्या व्यक्तीने सांगितले की, त्याला रेल्वेच्या खोदकामात सोन्याची साखळी सापडली असून, ती त्याला कमी किमतीत विकायची आहे.