हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील 141 कोटी 15 लाख रुपयाचे अनुदान डीबीटीद्वारे जमा
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले असून आतापर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे १७८ कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर 1 लाख 82 हजार 498 शेतकऱ्यांच्या खात्यावर 141 कोटी 15 लाख 3 हजार 339 रुपये मदतीचे अनुदान जमा करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज 18 ऑक्टोबर रोजी सांगितले.