देशाचे पहिले उपपंतप्रधान, भारताच्या एकीचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित “सरदार @१५० – एकता पदयात्रा” आणि विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून उत्तर रायगड भाजपच्यावतीने आज पनवेल ते शिरढोण भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पदयात्रेला विशेष उत्साह लाभला.