*लहवित रोडवरील पाळदे मळ्यात ८ वर्षांचा नर बिबट्या जेरबंद* देवळाली कॅम्प येथील लहवित रोडवर युवकावर हल्ल्याची घटना घडल्यानंतर वन विभागाने पाळदे मळ्यात सोमवारी सायंकाळी पिंजरा लावला. अवघ्या काही तासांत पहाटे ६.४५ वाजता ऊसाच्या शेतात ८ वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला. वनपरिक्षेत्राधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला नाशिक येथे हलवण्यात आले. दरम्यान, परिसरात अजूनही मादी बिबट्या व बछडे मुक्त संचार करत असल्याने अधिक पिंजरे लाव