तहसीलदार कार्यालयाकडून शेतजमिनीला रस्ता देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.परळी तालुक्यातीलसिरसाळा–औरंगपूर मुख्य रस्ता चक्क खोदून शेतकऱ्यांनी गुरुवार दि 18 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता तीव्र आंदोलन केले.वारंवार अर्ज व निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला.या आंदोलनामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद राहिला असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.