अर्धापूर: पांगरी फाटा रोडवर टाटा मॅजिक वाहनातून जनावरे वाहतूक करणाऱ्या विरूद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पांगरीफाटा रोडवर अर्धापूर येथे दि 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास यातील आरोपी साईनाथ सातेवार व इतर एक हे आपले ताब्यातील टाटा मॅजिक वाहन क्रमांक एम एस 26 16 किमती 70000 रुपयाची यामध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या एक गाय एक म्हैस जनावर किमती 50 हजार रुपयाचे वाहनांमध्ये निर्दयीपणे कोंबून वाहतूक करीत असताना पोलिसांना मिळून आले याप्रकरणी फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल गोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन तपास सुरू