भोकरदन: सिमेंट मिक्सर आणि टेम्पोची भीषण धडक, देवदर्शन करून परतणारे मामा भाचे जागीच ठार ,भायडी गावाजवळ झाला भीषण अपघात
आज दिनांक 16 जून 2026 वार मंगळवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील भायडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे,यामध्ये सिमेंट मिक्सर आणि मालवाहू टेम्पो म्हणजेच छोटा हत्तीची भीषण धडक झाली असून देवदर्शन करून परतणारे मामा भाचे जागीच ठार झाले आहे,यामध्ये ठार झालेल्यांची नावे ज्ञानेश्वर जनार्दन भुतेकर वय 25 वर्षे व भाचा प्रसाद संतोष शेळके व 14 वर्षे असे आहे,झालेल्य घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताची नोंद भोकरदन पोलिसांनी घेण्यात आली आहे.