सेनगाव: सोयाबीनच्या गंजी जाळून नुकसान केल्याने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची केंद्रा बुद्रुक येथील शेतकऱ्याची मागणी
सेनगांव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक या ठिकाणी 16 एकर वरील काढणी केलेल्या सोयाबीनच्या दोन ग अज्ञाताने पेटवुन दिल्याची घटना घडली असून त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी अकील शहा नूर शहा यांनी आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता केली आहे. सदर शेतकऱ्याने मक्तेदारी पद्धतीवर शेती केली होती त्यानंतर अज्ञाताने सदरच्या गंजी पेटवून दिल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून त्यामुळे तात्काळ सदर व्यक्तीवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सदर शेतकऱ्यांनी केली.