सेनगाव: भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा युवा मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय सेनगांव या ठिकाणी आज भाजपा युवा मोर्चाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये सेवा पंधरवडा,नमो युवा रन, नशा मुक्त भारत यासह विविध राजकीय विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला युवा मोर्चाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता सदरची बैठक संपन्न झाली.