चांदूर बाजार: मेळघाटातील मजुरांचे स्थलांतर थांबविण्याची, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सुखदेवराव पवार यांची मागणी
शिरजगाव कसबा सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार, यांनी आज दिनांक 11 ऑक्टोंबर ला दुपारी दोन वाजता मेळघाटातील दामजीपुरम येथील, रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या युवक युवतींची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा केली. मेळघाटातील स्थलांतरित होणाऱ्या मजुरांना मेळघाटातच कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी सुखदेवराव पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे