देवळी-पुलगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विकास कामे प्राधान्याने अधिवेशनात मांडणार असल्याचे आमदार राजेश बकाने यांनी सांगितले. सौर कुंपण योजना मार्गी लागल्यानंतर आता गुंजखेडा औद्योगिक वसाहतसंदर्भात शासनाचे पत्र प्राप्त झाले असून जागे संदर्भात येत्या आठ दिवसात सर्वे सुरू होईल,पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर होणार अन्याय आणि सेलसुरा येथे शासकीय कृषी विद्यालय स्थापनेची मागणी अश्या शेतकरी, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित बहुमुखी प्रश्न हिवाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडणार असल्य