पुर्णा: एकरूखा परिसरात शॉर्टसर्किट होऊन शेतातील दोन एकर ऊस जळून खाक ; ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Purna, Parbhani | Oct 23, 2025 पूर्णा तालुक्यातील एकरूखा परिसरातील गट क्रमांक २१ मध्ये शेतकरी योगीराज कोंडीबा तांबे यांची उसाची शेती आहे. बुधवार 22 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या खांबावरील विद्युत वाहिन्यात शॉर्टसर्किट होऊन दोन एकर ऊस जळून खाक झाला. याप्रकरणी शेतकरी योगीराज तांबे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात ताडकळस पोलिसांत आज गुरुवार 23 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.