अकोला: मावस भावाकडून 32 लाखांची फसवणूक; न्यायासाठी रघुनाथ अरबट यांचे दिवाळीच्या दिवशी अर्धनग्न आंदोलन.
Akola, Akola | Oct 21, 2025 अकोल्यातील बिल्डिंग मटेरियल व्यापारी रघुनाथ अरबट यांच्यासोबत मावस भावानेच 32 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यापूर्वी उघडकीस आली आहे. मजुरांच्या मजुरीसाठी दिलेले पैसे सागर कान्हेरकर या मावस भावाने हडप करून पळ काढल्याचा आरोप अरबट यांनी केला आहे. यावर सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झाला. मात्र पोलिसांनी आरोपीला सात महिन्यानंतर अटक केली असली तरी एक रुपयाही रिकव्हर झाला नसल्याचे आणि आरोपीची पत्नी तेजस्विनी हिची चौकशीही न झाल्याचे अरबट म्हणाले.