भडगाव: गिरड मांडकी रस्त्यावर वाळू माफियांचा धुडगूस, मध्यरात्रीच्या थरारात 37 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल,
भडगांव तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला व पोलिसांना दिनांक 30 डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री हुज्जतबाजी, धमकी व दगडफेकीचा सामना करावा लागल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी पाचोरा येथील सुमारे २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईदरम्यान सुमारे ३७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता मिळाली,