खामगाव: कासारखेड येथे रेशनचे १९१.३५ क्विंटल धान्य फस्त केल्याचे उघड
प्रभारी स्वस्त धान्य दुकानदारांसह तिघांवर गुन्हा
स्वस्त धान्य दुकानदाराने राजीनामा दिल्यामुळे सदर स्वस्त धान्य दुकान चालविण्याचा प्रभार घेणाऱ्या कासारखेड येथील स्वस्त धान्य दुकानदाराने आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने चक्क शिधापत्रिकाधारकांचे १९१.३५ क्विंटल गहु व तांदुळ वितरित न करता फस्त केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. त्यामुळे निरिक्षण अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून स्वस्त धान्य दुकानदारासह तिघांविरूध्द जिवनावश्यक वस्तू कायद्यान्वये पिपंळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.