शेगाव: बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरुच श्री गजानन महाराज भक्त निवास जवळून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास
बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरुच श्री गजानन महाराज भक्त निवास जवळून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.याबाबत अनिल निवृत्ती वाघमारे रा.पहूरजिरा यांनी त्याची दुचाकी MH-28-BC-7523 श्री गजानन महाराज भक्त निवास जवळ उभी करून केली होती. सदर दुचाकी उभ्या केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केली.