आकोट येथील रहिवासी सुधाकर हटवार हे सोमवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास आपल्या सायकलने वैयक्तिक कामासाठी जात होते. ते कोंढा येथील गांधी शाळेसमोर पोहोचले असता, मागून येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या टिप्परने (क्रमांक MH-49-0633) त्यांना जोरदार धडक दिली. टिप्परचा वेग इतका प्रचंड होता की, सुधाकर हटवार यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच प्राण गेला. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.