पालघर: डहाणू खाडी परिसरात 26 वर्षीय तरुणाची आत्महत्या
एका 26 वर्षाच्या तरुणाने डहाणू खाडी परिसरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अविनाश माच्छी या तरुणाचा घरी किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात तो घरातून निघून गेला त्यानंतर त्याची दुचाकी डहाणू खाडी पुलावर आढळून आली. त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही. त्याचा मृतदेह डहाणू खाडी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.